तोंडी तलाकमुळे घटस्फोट होत नाही - सलमा अन्सारी

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

तोंडी तलाक हा मुद्दाच होऊ शकत नाही. केवळ तीनदा तलाक हा शब्द उच्चारल्यामुळे कोडीमोड होऊ शकत नाही. या मुद्‌द्‌यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे कुराणमध्येच आहेत.

अलिगढ - "केवळ तीन वेळा "तलाक' असे म्हटल्याने घटस्फोट होत नाही. मुस्लिम महिलांनी धर्मगुरूंवर अवलंबून न राहता कुराणचा सखोल अभ्यास करावा,'' असे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी व्यक्त केले. 

तोंडी तलाकच्या मुद्‌द्‌यावर देशभर सध्या चर्चा सुरू असून, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. "तोंडी तलाक हा मुद्दाच होऊ शकत नाही. केवळ तीनदा तलाक हा शब्द उच्चारल्यामुळे कोडीमोड होऊ शकत नाही. या मुद्‌द्‌यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे कुराणमध्येच आहेत. त्यामुळे याबाबत मुस्लिम महिलांनी धर्मगुरूंच्या मतांवर अवलंबून न राहता स्वतः कुराणचा सखोल अभ्यास करावा,'' असे सलमा अन्सारी म्हणाल्या. 

तुम्ही जर कुराण वाचले तर त्यात तुम्हाला तोंडी तलाकचा नियम कोठेही दिसणार नाही. कुराणचे भाषांतर न वाचता मुस्लिम महिलांनी अरेबिक भाषेतील कुराण वाचले पाहिजे, असे सलमा अन्सारी म्हणाल्या.