'ते पालकांचा मधुचंद्र पाहुनच विश्‍वास ठेवतील'

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - "जे व्यक्ती भारतीय लष्करावर विश्‍वास ठेवत नाहीत, ते त्यांच्या पालकांचा मधुचंद्राचा व्हिडिओ पाहूनच विश्‍वास ठेवतील की हेच माझे वडिल आहेत‘, अशा सडेतोड भाषेत भारतीय जनता पक्षाचे आमदार रामेश्‍वर शर्मा यांनी "सर्जिकल स्ट्राईक‘वर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना शर्मा म्हणाले, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असोत, कॉंग्रेसचे संजय निरूपम असोत किंवा कोणत्याही पक्षाचे नेता असले तरीही जो पक्ष किंवा जो व्यक्ती भारतीय लष्करावर विश्‍वास ठेवत नाही, त्याला असच समजायला हवं की ते व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या मधुचंद्राचा व्हिडिओ पाहूनच विश्‍वास ठेवतील की हेच माझे आई-वडिल आहेत.‘ तसेच "जवान आपले रक्त सांडत आहेत. जवान स्वत:ला समर्पित करत आहेत. जे लोक जवानांवर विश्‍वास ठेवत नाहीत ते लोक देशद्रोही आहेत. ते लोक पाकिस्तानचे एजंट आहेत. त्यांच्या रूपात नवाज शरीफ किंवा एखादा पाकिस्तानचा एजंट बोलत आहेत‘, असेही शर्मा पुढे म्हणाले.

देश

गंगटोक - कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारल्यामुळे अनेक यात्रेकरू माघारी परतले असून, यामुळे चीनचा...

03.03 AM

पुरी (ओडिशा) - येथील प्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता देश-परदेशातील...

03.03 AM

श्रीनगर - श्रीनगरच्या बाहेर सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात सुरू झालेली चकमक आज तब्बल चौदा तासांनी सायंकाळी सहाच्या सुमारास...

02.03 AM