वास्को येथे मोबाईल शोरूमचे शटर वाकवून 35 लाखांची चोरी 

Thirtyfive lakhs of stolen in a mobile showroom in Vasco Goa
Thirtyfive lakhs of stolen in a mobile showroom in Vasco Goa

गोवा - वास्को येथील सॅमसंग गॅलेक्सी शोरूमच्या शटर्सला कुलूपे असून ते मधोमध वाकवून आत प्रवेश केला व चोरट्यांनी माेबाईल्स व इतर सामान मिळून सुमारे 35 लाखांचा एेवज लंपास केला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. शोरूममध्ये सीसी टीव्ही कॅमेरा होते मात्र चोरट्यांनी आत प्रवेश केल्यावर ही यंत्रणा बंद केली. ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी या शोरूमची टेहळणी केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या शोरूमच्या शटर्सच्या दोन टोकांना कुलुपे जशास तशी होती मात्र मध्यभागी कुलूप नसल्याने त्याचा फायदा चोरट्यांनी उठवून हे शटर मध्यभागी वाकवून आतमध्ये प्रवेश केला. या चोरीमध्ये सराईत गुन्हेगारी टोळी असण्याची शक्यता वास्को पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com