एक हजाराची नवी नोट येणार लवकरच

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: नोटाबंदीचा धक्कादायक निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने आता एक हजार रुपयाची नोट नव्या स्वरुपात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत, असे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. परंतु, नेमक्या कधी या नोटा सादर केल्या जातील याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

"आरबीआयने एक हजार रुपयाच्या नव्या नोटांची छपाईला सुरु केली आहे. जानेवारीमध्येच या नोटा सादर करण्याची योजना सुरु होती. मात्र, तेव्हा पाचशे रुपयांच्या नोटांच्या छपाईचे काम सुरु असल्याने या नोटांची छपाई करता आली नाही," असे रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तपत्राला सांगितले.

काळा पैशाविरुद्ध लढाई पुकारत गेल्यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी देशांतर्गत आर्थिक चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर पाचशे रुपयाची नोट नव्या स्वरुपात सादर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, दोन हजार रुपयांची नवी नोट सादर करण्यात आली होती.