"राष्ट्रगीताचा अपमान': तिघांना जमावाची मारहाण

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

चित्रपटाचे मध्यंतर झाले असताना विजी या चित्रपट परीक्षकाची गचांडी धरत एकाने त्याला राष्ट्रगीतासाठी उभे न राहण्याबद्दल विचारणा केली. यानंतर झालेल्या वादाचे पर्यवसन हिंसेत झाले. या 20 जणांच्या जमावाने विजी, श्रीला आणि सबारिथा यांना मारहाण केली..

चेन्नई - तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे न राहिल्याबद्दल सुमारे 20 जणांच्या क्रुद्ध जमावाने तीन जणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या तीन जणांमध्ये दोन महिला विद्यार्थ्यांचा समावेश होता.

चित्रपटाचे मध्यंतर झाले असताना विजी या चित्रपट परीक्षकाची गचांडी धरत एकाने त्याला राष्ट्रगीतासाठी उभे न राहण्याबद्दल विचारणा केली. यानंतर झालेल्या वादाचे पर्यवसन हिंसेत झाले. या 20 जणांच्या जमावाने विजी, श्रीला आणि सबारिथा यांना मारहाण केली.

"त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. आमचा राष्ट्रगीताप्रती अनादर दर्शविण्याचा कोणताही हेतु नव्हता,'' असे कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या श्रीला हिने नंतर बोलताना सांगितले. तर "राष्ट्रगीत सुरु असताना ते सेल्फी काढत असल्याचे,' विजयकुमार या अन्य एका विद्यार्थ्याने सांगितले. यामुळे जमावास राग आल्याची माहिती त्याने दिली.

दरम्यान, राष्ट्रगीत सुरु असताना चित्रपटगृहामधील नऊ पोलिस कर्मचारीदेखील बसून होते, असे अन्य एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे.