तीन नक्षलवाद्यांना छत्तीसगडमध्ये अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

भारत-तिबेट सीमा पोलिस व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेत मर्दापाल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यापैकी निल्धर ऊर्फ गुड्डू (वय 25) याच्यावर तीन लाखाचे बक्षीस होते

रायपूर - छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कोंडागाव जिल्ह्यातून तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली. यातील एकावर बक्षीस जाहीर केले होते.

भारत-तिबेट सीमा पोलिस व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेत मर्दापाल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यापैकी निल्धर ऊर्फ गुड्डू (वय 25) याच्यावर तीन लाखाचे बक्षीस होते, असे कोंडागावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेश्‍वर नाग यांनी सांगितले.

Web Title: three maoists arrested

टॅग्स