गुजरातेत कामगारांची तीन लाख बॅंक खाती

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 डिसेंबर 2016

अहमदाबाद - कामगारांनी खाती उघडावीत म्हणून गुजरातमधील बॅंकांनी प्रयत्न सुरू केले असून, आतापर्यंत तीन लाख खाती उघडण्यात आली आहेत. कामगारांना बॅंक खात्याची माहिती देण्यासाठी 5800 प्रशिक्षण वर्ग घेण्यात आल्याची माहिती "स्टेट लेव्हल बॅंकर्स कमिटी'चे (एसएलबीसी) निमंत्रक विक्रमादित्यसिंह खिची यांनी दिली.

बॅंकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक कारखानेमालकांनी कामगारांचा पगार या नव्या खात्यांत जमा केला आहे. नरोडा, वटवा आणि ओधाव या तीन औद्योगिक वसाहतींमध्ये दहा हजार बॅंक खाती उघडली गेली आहेत. भावनगर जिल्ह्यातील शिहोर शहरात सुमारे दोनशे कारखाने असून, त्यात तीन हजार कामगार काम करतात. त्यातील फक्त पन्नास टक्के कामगारांची बॅंकेत खाती होती. आता आणखी दोनशे कामगारांनी खाती सुरू केली असून, जास्तीत जास्त कामगारांनी खाती उघडावीत म्हणून बॅंका प्रशिक्षण वर्ग घेणार असल्याची माहिती देण्यात आली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत असलेल्या खात्यांत भरीव रक्कम जमा झाली असून, "पीएमजेडीवाय'च्या संकेतस्थावरील माहितीनुसार, नोव्हेंबर 30 अखेर या खात्यांत 3649.21 कोटी रुपये होते. 24 ऑगस्टपर्यंत या खात्यांत 1542.77 कोटी रुपयांची रक्कम होती.

Web Title: Three million bank accounts for workers in Gujarat