दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना
जम्मू - काश्‍मीरमधील माचिल भागात संशयित दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले. दहशतवाद्यांनी एका जवानाचा शिरच्छेद करत विटंबना केल्याने भारतीय नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निश्‍चय घेतला आहे.

दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने हुतात्मा झालेल्या जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्याची एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. माचिल भागात दहशतवाद्यांनी गवताळ प्रदेश आणि घनदाट जंगलांचा आधार घेत घुसखोरी केली आणि दुपारच्या सुमारास गस्त घालत असलेल्या लष्कराच्या पथकावर हल्ला केला. या वेळी पाकिस्तानच्या सैनिकांकडून चार ठिकाणी तोफगोळ्यांचा जोरदार मारा सुरू होता, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. अधिक माहिती देण्यास मात्र या प्रवक्‍त्याने नकार दिला. 28 ऑक्‍टोबरलाही दहशतवाद्यांनी माचिल सेक्‍टरमध्ये घुसखोरी करत केलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला होता. या जवानाच्याही मृतदेहाची दहशतवाद्यांनी विटंबना केली होती. या हल्ल्या वेळीही पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेवर जोरदार गोळीबार करत दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास सोयीची परिस्थिती निर्माण केली होती.

दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल त्यांना सलाम.
- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री