विषबाधा झाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

सर्वांनी दुपारचे जेवण घेतल्यानंतर विषबाधा झाली. मात्र, विषबाधेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी हुलियार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तुमकूर (कर्नाटक) - विषबाधा झाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार किरण कुमार यांच्या चिक्कनायकाना हल्ली येथील विद्यावर्धिनी इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये हा प्रकार घडला. शाळेच्या वसतीगृहात बुधवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर विषबाधा झाली. मात्र, विषबाधेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेत 15 वर्षांच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शांतामूर्ती, आकांक्षा पल्लक्की आणि श्रेयस यांचा समावेश आहे. याशिवाय शालेचा सुरक्षा रक्षक आणि अन्य दोन विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी हुलियार पोलिस स्थानक गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शाळेच्या वसतीगृहात एकूण 40 विद्यार्थी राहतात. बुधवारी रात्रीच्या जेवणामध्ये पोळी, भात आणि सांबर होते. मात्र, काही विद्यार्थ्यांना सांबरमध्ये निळसर रंग दिसत होता.