शिक्षण सुधारण्यासाठी प्रयत्न केले- स्मृती इराणी

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जुलै 2016

नवी दिल्ली- दोन वर्षांत शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद, असे माजी केंद्रीय मुनष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. 

केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये बुधवारी (ता. 5) बदल करण्यात आले. स्मृती इराण यांच्याकडील मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते काढून त्यांच्याकडे वस्त्रोद्योग हे खाते देण्यात आले आहे. 

इराणी म्हणाल्या, गेली दोन वर्षे शिक्षण क्षेत्रासाठी मोठे काम केले आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. पंतप्रधानांना धन्यवाद देतानाच त्यांनी माझ्यावर वस्त्रोद्योगाची जबाबदारी दिली आहे. यापुढे त्या क्षेत्रासाठी काम करणार आहे. लोक काही बोलत राहतील. परंतु, बोलणे हे नागरिकांचे कामच आहे.

टॅग्स