आसाराम बलात्कारप्रकरण ; चौकशी अधिकाऱ्याला 2 हजार धमकीपत्रे

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून राजस्थानच्या जोधपूर विशेष न्यायालयाकडून आसाराम दोषी आढळला. त्याने 2013 मध्ये जोधपूर आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

नवी दिल्ली : बलात्कारप्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसारामबापूच्या चौकशी अधिकाऱ्याला तब्बल 2 हजार धमकीपत्रे आणि फोन आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जोधपूर पश्चिमचे पोलिस उपायुक्त अजय पाल लांबा असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे.

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून राजस्थानच्या जोधपूर विशेष न्यायालयाकडून आसाराम दोषी आढळला. त्याने 2013 मध्ये जोधपूर आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या बलात्कारप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एका प्रकरणावर आज सुनावणी घेण्यात आली. यातील तत्कालीन चौकशी अधिकारी लांबा म्हणाले, 20 ऑगस्ट, 2013 रोजी अशाप्रकारचे हायप्रोफाइल खटले चालवले आहेत. आसारामबापूच्या चौकशीदरम्यान मला 2 हजार धमक्यांचे पत्र आणि फोन आले होते. 

तसेच मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमक्याही देण्यात आल्या होत्या. माझा फोन वाजण्याचे बंद झाले नाही. मात्र, मी अनोळखी क्रमांकावरून येणारे फोन घेणे बंद केले होते. मात्र, उदयपूर येथे बदली झाल्यानंतर मला धमक्यांचे पत्र येणे बंद झाले, असे लांबा म्हणाले.   

Web Title: Top police who led probe in Asaram rape case received 2000 threat letters and phone calls