गोव्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरस, राणेंचा विक्रमी विजय

टीम ईसकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

जायंट किलर
 
मांद्रे मतदारसंघ
विजयी : दयानंद सोपटे (काँग्रेस)
पराभूत : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (भाजप)

शिवोली मतदारसंघ
विजयी : विनोद पालयेकर (गोवा फॉरवर्ड) 
पराभूत : दयानंद मांद्रेकर (भाजप)

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात दुपारपर्यंत काटे की टक्कर सुरू होती. दुपारपर्यंत काँग्रेसला 9, तर भाजपलाही 10 जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट होत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे यांनी दहाव्यांदा विजय मिळवत विक्रम प्रस्थापित केला.

भाजपला प्रथम दोन अंकी संख्या गाठण्यात यश आले असले आहे. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 3, तसेच गोवा फॉरवर्डला 3, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 

जायंट किलर
मांद्रे मतदारसंघ

विजयी : दयानंद सोपटे (काँग्रेस)
पराभूत : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (भाजप)

शिवोली मतदारसंघ
विजयी : विनोद पालयेकर (गोवा फॉरवर्ड) 
पराभूत : दयानंद मांद्रेकर (भाजप)

मडकई मतदारसंघातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदिन ढवळीकर यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. त्याचप्रमाणे, युनायटेड गोवा फ्रंटच्या बाबूश मोन्सेरात यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी 

विजेते उमेदवार : 
दक्षिण गोवा - गोविंद गावडे (अपक्ष), दीपक पावसकर (मगोप), विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड), सुभाष शिरोडकर (काँग्रेस), बाबू कवळेकर (काँग्रेस), चर्चिल अलेमाओ (राष्ट्रवादी), माविन गुदिन्हो (भाजप), मिलिंद नाईक (भाजप). 

उत्तर गोवा - प्रतापसिंह राणे (काँग्रेस), प्रवीण झाँट्ये (भाजप), ग्लेन टिकलो (भाजप), फ्रान्सिस डिसोझा (भाजप), फ्रान्सिस सिल्वेरा (काँग्रेस), दयानंद सोपटे (काँग्रेस)