मोदी सरकारकडून देशद्रोह ; काँग्रेसचा आरोप

Treason by Modi government Congress allegations
Treason by Modi government Congress allegations

नवी दिल्ली : मोदी सरकार इतर देशांना स्वस्तात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करीत असल्याने देशातील नागरिकांना महागड्या दराने इंधनाची खरेदी करावी लागत आहे, असा आरोप कॉंग्रेसने शुक्रवारी केला. सरकारने देशद्रोह केला असून, जनता याला निवडणुकीत योग्य उत्तर देईल, असा इशाराही कॉंग्रेसने दिला. 

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ""इंधनदर वाढीमुळे अनेक गोष्टींचे भाव वाढत असून, सामान्य नागरिकांची होरपळ सुरू आहे. सरकारने "राक्षसी' कराच्या माध्यमातून देशाचे 11 लाख कोटी रुपये लुटले आहेत. मोदी सरकार इतर देशांना स्वस्तात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करीत आहे. यामुळे देशात इंधनाचे भाव ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेले आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे.'' 

""सरकारकडून इंधनावर राक्षसी स्वरूपाचा कर आकारण्यात येत आहे. या करामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे. या करातून मोदी सरकारने आतापर्यंत 11 लाख कोटी रुपये कमावले आहेत. इंधन दरवाढीचा फटका मध्यमवर्गीय, शेतकरी, वाहतूकदार, लघू व मध्यम उद्योगांना बसत आहे,'' असे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com