तोंडी तलाक 1400 वर्षे जुनी परंपरा: सिब्बल

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

1400 वर्षे जुनी ही परंपरा स्वीकारण्यात आलेली आहे. त्यामुळे या परंपरेला असंविधानिक कसे काय ठरविण्यात येवू शकते. माझी भगवान रामाबद्दल श्रद्धा असून, अयोध्येत रामाचा जन्म झाला आहे असे माझे म्हणणे आहे. हे सर्व प्रकरण श्रद्धेशी जोडले गेलेले आहे.

नवी दिल्ली - तोंडी तलाक (ट्रिपल तलाक) ही परंपरा मुस्लिम समुदायात 1400 वर्षे जुनी परंपरा असून, हा विषय मुस्लिमांच्या श्रद्धेशी जोडला गेला असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाची (एआयएमएलबी) सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडत असलेल्या कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

तोंडी तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून, कपिल सिब्बल यांनी एआयएमएलबी यांची बाजू मांडली. सिब्बल म्हणाले, की 1400 वर्षे जुनी ही परंपरा स्वीकारण्यात आलेली आहे. त्यामुळे या परंपरेला असंविधानिक कसे काय ठरविण्यात येवू शकते. माझी भगवान रामाबद्दल श्रद्धा असून, अयोध्येत रामाचा जन्म झाला आहे असे माझे म्हणणे आहे. हे सर्व प्रकरण श्रद्धेशी जोडले गेलेले आहे. सर्वच पुरुष प्रधान समाज पक्षपाती आहेत. 

त्यापूर्वी सोमवारी एआयएमएलबीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते, की हा वाद फक्त तोंडी तलाक प्रकरणावर नाही. तर, समुदायातील पुरुष प्रधानतेबद्दल आहे.