आता समान अधिकारांसाठी लढा

झाकिया सोमण, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन, संस्थापक सदस्य
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाने कायम हाच विचार मांडलेला. शहाबानो प्रकरणानंतर देशातल्या सामाजिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने तलाकबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात आम्ही घेतलेल्या भूमिकेला तळागाळातील मुस्लिम महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. ५० हजार मुस्लिम महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाला दिले होते.

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाने कायम हाच विचार मांडलेला. शहाबानो प्रकरणानंतर देशातल्या सामाजिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने तलाकबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात आम्ही घेतलेल्या भूमिकेला तळागाळातील मुस्लिम महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. ५० हजार मुस्लिम महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाला दिले होते. तोंडी तलाकचा निर्णय हा केवळ मुस्लिम महिलांसाठीच नव्हे तर भारतीय महिलांसाठीही महत्त्वाचा असल्याने तो ऐतिहासिक निर्णय आहे. पोटगी, कौटुंबिक हिंसाचारासारखे प्रश्‍न हे सर्व समाजात सारखेच आहेत. या निर्णयाचा या पुढे अस्त्रासारखा वापर केला जाईल, तो आम्ही नक्‍कीच करू. आमचा लढा संपलेला नाही. बहुपत्नीत्व, मालमत्तेमध्ये समान अधिकारासारख्या प्रश्‍नांवर या पुढेही आम्ही धडका देतच राहू.

Web Title: triple talaq muslim women Supreme Court Zakia Soman