स्पीडपोस्टाने दिला तलाक; पीडितेची मोदींकडे धाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

एका महिलेच्या पतीने तिला स्पीडपोस्टाने तोंडी तलाक पाठविला असून पीडित महिलेने या विरोधात न्यायाच्या अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे धाव घेतली आहे.

कानपूर (उत्तर प्रदेश) - एका महिलेच्या पतीने तिला स्पीडपोस्टाने तोंडी तलाक पाठविला असून पीडित महिलेने या विरोधात न्यायाच्या अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे धाव घेतली आहे.

पीडित महिलेने या प्रकरणाबाबत ट्‌विटरद्वारे मोदी आणि योगी यांना या प्रकरणाची माहिती देत न्यायाची मागणी केली आहे. "कृपया माझी मदत करा. माझ्या पतीने स्पीडपोस्टाने मला तलाक दिला आहे. तुम्ही मला भेटण्यासाठी वेळ द्या. मला न्याय द्या.' पुढे तिने असेही म्हटले आहे की 'मी तोंडी तलाकच्याविरुद्ध असून ही प्रथा संपायला हवी.' पीडित महिला 23 नोव्हेंबर 2016 रोजी विवाहबद्ध झाली आहे. सहाय्यक कामगार आयुक्त असलेल्या तिच्या पतीने तिला स्पीडपोस्टाद्वारे तोंडी तलाक पाठविला आहे.

मागील महिन्यातही एका गर्भवती महिलेला तिच्या पतीने मारहाण करत घराच्या बाहेर काढून तोंडी तलाक दिला. तिनेही न्याय मिळावा आणि तोंडी तलाकची प्रथा संपावी यासाठी मोदींना पत्र लिहिले आहे.

Web Title: Triple talaq through post; Victim writes to PM, CM