तृप्ती देसाई जानेवारीत सबरीमाला मंदिरात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

कन्नूर (केरळ) : महाराष्ट्रातील शनी मंदिर आणि हाजी अली दर्ग्याचे दरवाजे महिलांसाठी खुले करून देणाऱया कार्यकर्त्या तृप्ती देसाई येत्या 10 ते 25 जानेवारी दरम्यान केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत. 
 
देसाई यांनी eSakal शी बोलताना सांगितले, की या आंदोलनात महाराष्ट्रातील त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. देसाई सध्या केरळमध्ये आहेत. पय्यानूर येथे आयोजित दोन दिवसांच्या 'स्वतंत्र लोकम-2016' चर्चासत्रात बोलताना त्या म्हणाल्या, सबरीमाला मंदिरात प्रवेशाचा मुद्दा कोणत्याही स्वरुपाच्या वादात पडू नये, असे मला वाटते. मंदिर प्रवेश हा महिलांच्या हक्काचा भाग आहे. 
 
देसाई यांनी चर्चासत्रात लैंगिक न्याय आणि समानता या विषयावर शोधनिबंध सादर केला. देवाने कोणत्याही प्रकारचा रंगभेद अथवा लैंगिक दुजाभाव केलेला नसताना काही ठराविक लोक त्यांच्या स्वार्थासाठी स्त्रियांवर वेगवेगळ्या कारणांखाली बंधने लादत आहेत, अशी मांडणी त्यांनी केली.