अरुणाचल प्रदेशमध्ये चीन सीमेपर्यंत पोचण्यासाठी बोगद्याची निर्मिती करणार

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

हा बोगदा केल्यामुळे 13 हजार 700 फुट उंचीवरील सेला पासचा वापर करण्याची गरज भासणार नाही आणि पर्वतरांगातून जाणाऱ्या मार्गापेक्षा सात किलोमीटरहून अधिक अंतर कमी होणार आहे

इटानगर - अरुणाचल प्रदेशमध्ये चीन सीमेपर्यंत पोचण्यासाठी संरक्षण आणि गृहमंत्रालयाचे अधिकारी मोठा बोगदा तयार करण्याचे नियोजन करत आहे.

सीमाभागात रस्ते निर्मिती करणाऱ्या सीमा रस्ते संघटना (बीआरओ) यास तवांग येथे दोन मार्गिकांच्या बोगदा निर्मितीचे काम सोपवले आहे.

नव्या बोगद्यामुळे तवांग आणि तेजपूरच्या लष्करी मुख्यालयात जाण्यासाठी एका तासाहून अधिक वेळेत बचत होणार आहे. हा बोगदा केल्यामुळे 13 हजार 700 फुट उंचीवरील सेला पासचा वापर करण्याची गरज भासणार नाही आणि पर्वतरांगातून जाणाऱ्या मार्गापेक्षा सात किलोमीटरहून अधिक अंतर कमी होणार आहे. बीआरओना या कामासाठी अरुणाचल सरकारकडे जमीन मागितली आहे.

हिमालयाच्या पूर्वेकडे असलेल्या अरुणाचलच्या पर्वतरांगात बोगदा तयार झाल्यास वाहतूकीचे अंतर कमी होईल तसेच वेळही वाचणार नाही. अलिकडेच बीआरओचे प्रोजेक्‍ट कमांडर आरएस. राव यांनी पश्‍चिम विभागाचे सोनल स्वरुप यांची भेट घेऊन जमीनीसंदर्भात पत्र लिहून आवश्‍यक कागदपत्रे सुपूर्द केली आहे. सध्या तवांगपर्यंत 12.37 किलोमीटरच्या रस्त्याचे काम सुरू असून जेणेकरून सेलापासचा रस्ता वापरण्याची गरज भासणार नाही.

टॅग्स