"स्टरलाइट'ची दारे कायमची बंद करा - रजनीकांत यांचे आवाहन

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

​रजनीबोल 
गोळीबार करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी 
पोलिसांवर हात उचलणाऱ्यांनाही माफी नाही 
कायदेशीर पातळीवर सरकारने लढावे 
राज्य सरकारदेखील आंदोलनास जबाबदार 
आंदोलकांनीही शांतता ठेवावी 

तुतीकोरिन : तमिळनाडूतील स्टरलाइट प्रकल्पाविरोधातील आंदोलनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता या प्रकल्पाविरोधातील आंदोलनास राजकारणात पदार्पण करू पाहणारे सिनेअभिनेते रजनीकांत यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रकल्पाच्या मालकास अमानवी ठरवित त्यांनी स्टरलाइटची दारे पुन्हा उघडू देऊ नका, असे म्हटले आहे. 

तुतीकोरिनमधील स्टरलाइट प्रकल्पाविरोधातील आंदोलन 22 मे रोजी शांततेत सुरू होते; पण काही समाजविरोधी घटकांनी त्याला हिंसक वळण लावल्याचा आरोपही रजनीअण्णांनी केला. आज येथील रुग्णालयास भेट देऊन त्यांनी आंदोलनामध्ये जखमी झालेल्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. ""राज्य सरकारने समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करावी. हे आंदोलन सरकारसाठीदेखील मोठा धडा आहे. कोणालाही असा हिंसाचार अपेक्षित नव्हता. या हिंसाचारामागे मोठे राजकारण असून, लोकांनाही ते माहिती आहे. जनता योग्य वेळी याचे उत्तर देईल, '' असे सांगतानाच रजनीकांत यांनी प्रत्येक गोष्टींवरून नेत्यांचे राजीनामे मागणे चुकीचे असल्याचे सांगितले. लोकांपेक्षा दुसरी कोणतीही मोठी शक्ती असत नाही. त्यामुळे लोकांनी आता स्टरलाइटला उच्च न्यायालयामध्येही जाऊ देऊ नये, असेही त्यांनी नमूद केले. 

रजनीबोल 
गोळीबार करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी 
पोलिसांवर हात उचलणाऱ्यांनाही माफी नाही 
कायदेशीर पातळीवर सरकारने लढावे 
राज्य सरकारदेखील आंदोलनास जबाबदार 
आंदोलकांनीही शांतता ठेवावी 

Web Title: Turn off "Starlite" doors forever says rajnikanth