मोदीजी मुलींना जन्म घालण्यास भीती वाटते; अभिनेत्री भडकली

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

महिलांना कोणत्याही पक्षाला मतदान केले नाही पाहिजे. या देशात महिलांना कोणतेही महत्त्व नसून, आपण राहत असलेले बलात्काऱ्यांचे नंदनवन आहे. महिलांना येथे कोणतेही स्थान नाही. आता मुलींना वाचवा? अशी परिस्थिती आहे. मला मुलाचा इच्छा नाही. पण, मुलीला जन्म देण्यास भीती वाटत आहे.

मुंबई : मला मुलाला जन्म घालण्याची कोणतीही हौस नाही. पण, आता मुलीला जन्म देताना भीती वाटते, अशी खळबळजनक याचना टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी-दाहिया हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत ट्विटरवरून केली आहे.

'ये है मोहब्बते' या मालिकेत काम करत असलेली टिव्हि अभिनेत्री दिव्यांकाने मोदींना टॅग करत अनेक ट्विट केले आहेत. स्वातंत्र्यदिनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तिने हे ट्विट करत भारतात वाढत असलेल्या बलात्काराच्या घटनांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

चंदिगडमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाहून परतताना एका आठवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. कार्यक्रमावरून येत असताना तिला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला होता. याच घटनेवरून दिव्यांकाने मोदींकडे ही याचना केली आहे.

दिव्यांकाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की महिलांना कोणत्याही पक्षाला मतदान केले नाही पाहिजे. या देशात महिलांना कोणतेही महत्त्व नसून, आपण राहत असलेले बलात्काऱ्यांचे नंदनवन आहे. महिलांना येथे कोणतेही स्थान नाही. आता मुलींना वाचवा? अशी परिस्थिती आहे. मला मुलाचा इच्छा नाही. पण, मुलीला जन्म देण्यास भीती वाटत आहे. मी तिला काय सांगणार तुला स्वर्गातून नरकात पाठवत आहे. मोदीजी स्वच्छता अभियानांतर्गत देशातून बलात्कारी नराधमांचा कचरा काढून टाका. या नराधमांना घाबरून जगू शकत नाही. या बलात्कारी नराधमांना अशी शिक्षा द्या की त्यांची महिलांकडे वाईट नजर पडणार नाही. मोदीजी तुमच्यावर विश्वास आहे, काहीतरी करा.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :