पाकमध्ये गेलेले धर्मगुरु भारतात परतले

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

सैयद असिफ निझामी आणि त्यांचा पुतण्या नझिम निझामी अशी त्यांची नावे असून त्यांना लाहोरमधील अल्लमा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मार्चला ताब्यात घेण्यात आले होते.

नवी दिल्ली - दिल्लीतील हझरत निझामुद्दिन दर्ग्याचे हरविलेले दोन धर्मगुरू आज (सोमवार) पाकिस्तानमधून पुन्हा भारतात परतले आहेत. 

या दोन धर्मगुरुंच्या सुटकेबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करत हे दोन्ही धर्मगुरु सोमवारी भारतात परततील असे सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी हे दोघेही भारतात परतले आहेत. दोन्ही धर्मगुरु सुखरुप आहेत. या दोघांचे मुत्तहिदा कौमी चळवळीशी संबंध असल्याने पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने त्यांना अटक केल्याचे समजते. 

सैयद असिफ निझामी आणि त्यांचा पुतण्या नझिम निझामी अशी त्यांची नावे असून त्यांना लाहोरमधील अल्लमा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मार्चला ताब्यात घेण्यात आले होते. असिफ निझामी हे दिल्लीतील दर्ग्याचे प्रमुख धर्मगुरू आहेत. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानात ते गेले होते, परंतु परतताना त्यांना अटक झाली. 14 मार्चपासून त्यांच्याशी संपर्क न झाल्याने ते हरविल्याचे मानले जात होते.

Web Title: Two Indian clerics who had gone missing in Pakistan, return to India