जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

बारामुल्ला (जम्मू-काश्‍मिर) - बारामुल्ला येथून जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे काही हत्यारेही सापडली आहेत.

बारामुल्ला (जम्मू-काश्‍मिर) - बारामुल्ला येथून जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे काही हत्यारेही सापडली आहेत.

जम्मू-काश्‍मीरमध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान बारामुल्ला येथे सुरक्षा पथकाला दोन तरुण संशयास्पद स्थितीत आढळले. या दोघांची सखोल चौकशी केली असता ते जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची आणखी चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांचे साथीदार, त्यांच्या हल्ल्याच्या योजना याबाबतची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.

गुरुवारी हिज्बुल मुजाहिद्दीनचा एका दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.