soldier
soldier

काश्मीरमध्ये कारवाईत दोन दहशतवादी ठार

श्रीनगर (जम्मू-काश्मीर)- अनंतनाग जिल्ह्यात असलेल्या बिजेभारा भागामध्ये सुरक्षारक्षकांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतावादी ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजेभारा भागात असलेल्या एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई सुरू केली असता दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली. जवानांनी अखेर घर उडवून दिले. यामध्ये दोन्ही दहशतवादी जागीच ठार झाले आहेत.

दरम्यान, दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, ते जळालेल्या अवस्थेत आहेत. या चकमकीमध्ये एक जवान जखमी झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com