2500 रुपयांत करा 'उडाण'; राज्यातील 5 शहरे

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

महाराष्ट्रातील हवाई मार्ग
नांदेड - मुंबई

नांदेड - हैदराबाद

नाशिक (ओझर) - मुंबई

नाशिक (ओझर) - पुणे

कोल्हापूर - मुंबई
जळगाव - मुंबई

सोलापूर - मुंबई

नवी दिल्ली : 'उडाण' योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 5 शहरांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, या मार्गांवर अवघ्या 2500 रुपयांत प्रवास करता येणार आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती यांनी आज (गुरुवार) या योजनेतील 45 मार्ग जाहीर करण्यात आले.

केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी 'उडाण' योजनेच्या अंमलबजावणीला सुरवात करण्यात आली. मंत्री राजू यांनी याबाबतची घोषणा केली. ‘उडाण’ योजनेनुसार एक तासापर्यंतचा विमान प्रवास केवळ 250 रुपयांमध्ये करणे शक्य होणार आहे. या योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच गुंतवणूक वाढेल, असा विश्वास राजू यांनी व्यक्त केला.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य...
एकूण उपलब्ध जागांच्या निम्म्या जागा या 2500 रुपयांच्या असतील. त्यापुढील बाकीच्या जागांसाठी नियमित शुल्क घेण्यात येईल. जे अगोदर तिकीट आरक्षित करतील त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. 

 

Web Title: udan provides low rate flights