गायीचे शेपूट कापल्याच्या संशयावरून एकाला मारहाण

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

उज्जैन : गायीचे शेपूट कापल्याच्या संशयावरून स्वयंघोषित गोरक्षकांच्या जमावाने एकाला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

उज्जैन : गायीचे शेपूट कापल्याच्या संशयावरून स्वयंघोषित गोरक्षकांच्या जमावाने एकाला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण समोर आले. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला बेल्टने आणि लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. मारहाण करणारे लोक गायीचे शेपूट तोडल्याचा आरोपही करत आहेत. पीडित व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जिवालजीगंज पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी ओ पी मिश्रा यांनी हा प्रकार पैशाच्या देवाणघेवाणीवरून झाल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओवरून पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार चार जणांना ताब्यात घेतले आहे.