बेरोजगारीची आकडेवारी दोन महिन्यांत जाहीर करू : गंगावार

Unemployment Data Released To Be In The Next 2 Months
Unemployment Data Released To Be In The Next 2 Months

नवी दिल्ली : रोजगारनिर्मितीसाठी सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जात असून, येत्या दोन महिन्यांत सरकार बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करेल, अशी माहिती आज राज्यसभेत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोषकुमार गंगावार यांनी दिली. 

भारतातील रोजगाराच्या संधींचे प्रमाण घटले नसून जागतिक आकडेवारीनुसार देखील भारतात बेरोजगारीचे प्रमाण कमीच असल्याचे म्हटले आहे, असे गंगावार म्हणाले. नोव्हेंबर 2016 पासून ते आजतागायत बेरोजगारीसंदर्भातील आकडेवारी उपलब्ध नसून त्याचे सर्व्हेक्षण सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत अहवाल तयार होईल. रोजगारनिर्मितीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगत पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम (पीएमइजी) आणि एमजीईआरजीएस राबवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. 

तीनशेहून अधिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची नोंद 
चालू वर्षात जानेवारी ते जूनपर्यंत भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयकडून देशभरात 314 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. लोकसभेत लेखी प्रश्‍नाला उत्तर देताना सीबीआयने 2017 वर्षात एकूण 632 गुन्ह्याची नोंद केल्याचे सांगितले. त्याचबरोबर 2015 आणि 2016 या वर्षात अनुक्रमे 617 आणि 673 गुन्हे दाखल झाले आहेत. 

नैसर्गिक आपत्तीचे एक हजार बळी 
मे महिना आणि जून महिन्यात देशात विविध ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे सुमारे एक हजाराहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी आज राज्यसभेत माहिती दिली. पूर, चक्रीवादळ, दरड कोसळणे आदी घटनांत 1 हजार 6 जणांचा मृत्यू झाला. त्यात उत्तर प्रदेशातील 352 जणांचा समावेश आहे; तसेच 360 जण जखमी झाले आहेत. ओडिशात 97, पश्‍चिम बंगालमध्ये 74, आंध्रात 73, कर्नाटक आणि केरळमध्ये 71, झारखंडमध्ये 51, राजस्थानमध्ये 45; तर आसाममध्ये 44 जणांचा मृत्यू झाला. देशात एकूण 635 जण जखमी झाल्याचे रिजीजू म्हणाले. 

तीन वर्षांत बलात्काराच्या 1 लाख घटना 
2014-16 या तीन वर्षांत देशात बलात्काराच्या 1 लाख 10 हजार 333 प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी दिली. 2016 मध्ये 38 हजार 947 प्रकरणे; तर 2015 मध्ये 34 हजार 651 आणि 2014 मध्ये 36 हजार 735 घटना घडल्या आहेत. याशिवाय महिलासंबंधी 2016 मध्ये 3 लाख 38 हजार 956 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2015 मध्ये 3 लाख 29 हजार 243; तर 2014 मध्ये 3 लाख 39 हजार 457 गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती लेखी उत्तरात देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com