उरी हल्ल्यातील जखमी जवानाचा मृत्यू

पीटीआय
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी 12 दिवसांपूर्वी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाचे शुक्रवारी निधन झाले. यामुळे हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांची संख्या 19 झाली आहे.

नाईक राज किशोर सिंग याच्यावर लष्कराच्या येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. राज सिंग हा मूळचा बिहारमधील अरा जिल्ह्यातील पिपरती गावचा रहिवासी आहे. तो उरी येथील तळावर तैनात होता. 18 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तो जखमी झाला होता. 