'यूपी'त काँग्रेस लढणार स्वबळावर

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

केंद्रीय नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील यापुढील निवडणूक काँग्रेस युतीशिवाय लढेल.

लखनौ - काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने (सप) एकत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे भविष्यातही हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता होती. मात्र, काँग्रेसने आताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

राज बब्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील यापुढील निवडणूक काँग्रेस युतीशिवाय लढेल.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपने 403 पैकी 324 जागा जिंकत एकहाती विजय मिळविला होता. सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची युती कमाल दाखवू शकली नव्हती.