उ. प्रदेशात ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे 49 बालके दगावली

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

उत्तर प्रदेश राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत येथील जिल्हाधिकारी रवींद्र कुमार या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गोरखपूर येथे नुकत्याच घडलेल्या अशाच स्वरुपाच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही नवी घटनाही अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद येथील जिल्हा रुग्णालयात प्राणवायुच्या कमतरतेमुळे 49 बालकांचा मृत्यु झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील मुख्य वैद्यकीय अधीक्षक व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरात या रुग्णालयात ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे 49 लहान मुले दगावली आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत येथील जिल्हाधिकारी रवींद्र कुमार या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गोरखपूर येथे नुकत्याच घडलेल्या अशाच स्वरुपाच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही नवी घटनाही अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट