गोरखपूरमध्ये 46 तासांत 42 बालकांचा मृत्यू

पीटीआय
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

'बीआरडी'चे प्राचार्य सिंह यांची माहिती; बहुतांश मृत्यू मेंदूज्वरामुळेच

गोरखपूर: येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये मागील 46 तासांमध्ये 42 बालकांचा मृत्यू झाला आहे. यातील 7 बालकांचा मृत्यू हा मेंदूज्वरामुळे झाला असून, अन्य बालकांच्या मृत्यूची कारणे वेगळी आहेत, असे प्राचार्य डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले. ऑगस्ट 26च्या मध्यरात्रीपासून 27 च्या रात्रीपर्यंत 6 बालकांच्या मृत्यूची नोंद झाली असून, "आयसीयू'मधील 11 बालकेही दगावली आहेत.

ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर येथील रुग्णालयामध्ये 290 बालकांचा मृत्यू झाला असून, यातील 213 ही नवजात अर्भके असून 77 बालकांचा मृत्यू हा मेंदूज्वरामुळे झाला आहे. जानेवारीपासून विशेषत: मेंदूज्वरामुळे 1 हजार 250 जणांचा मृत्यू झाला आहे. या बालकांना योग्य वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते, असेही सिंह यांनी नमूद केले.

कॉंग्रेसची टीका
भाजपशासित राज्यांमध्ये होणाऱ्या बालमृत्यूवर कॉंग्रेसने आज सडकून टीका केली. झारखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये झालेले मृत्यू हे राज्य सरकारांनी केलेले खून आहेत, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. कॉंग्रेसचे झारखंड आणि उत्तरप्रदेशचे प्रभारी आर. पी. एन. सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बालमृत्यूची आकडेवारी जाहीर केली. राज्य सरकारांनी याबाबत स्थापन केलेल्या समित्यांनी यामध्ये कोठेच सरकारने दुर्लक्ष केले नसल्याचा निर्वाळा दिला असला तरीसुद्धा नवजात अर्भकांसाठीची उपकरणे कोणत्याच रुग्णालयामध्ये उपलब्ध झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.