अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

शहाजहानपूर : उत्तर प्रदेशच्या बान्नू नागरिया गावात दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहाजहानपूर : उत्तर प्रदेशच्या बान्नू नागरिया गावात दोन अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बान्नू नगारिया गावातील या दोन अल्पवयीन बहिणी मंगळवारी नैसर्गिक विधीसाठी जात असताना तीन जणांनी त्यांना मारहाण करुन बलात्कार केला, असे मदनपूर पोलिस ठाण्याचे प्रमुख ओमप्रकाश गौतम यांनी सांगितले. पीडित मुलींनी त्यांना विरोध करताच त्यांनी या मुलींना मारहाण केली. पीडित मुलींच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे मंडल अधिकारी अरुणचंद्र यांनी सांगितले. या प्रकरणी संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. दोन्ही मुलींची वैद्यकीय चाचणी घेण्यात येत आहे.