उत्तर प्रदेशात बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

मुझफ्फरनगर: येथील श्‍यामली जिल्ह्यातील जबलपूर येथे एका अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून आणि मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.

पीडित मुलगी घरात एकटीच असताना संशयित अंकीत कुमार याने घरात घुसून पिस्तूलचा धाक दाखवीत बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे अंकित कुमार याने या मुलीला मारहाणही केली, सर्कल अधिकारी राजेशकुमार यांनी सांगितले. या प्रकरणी अंकित कुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या एका घटनेत श्‍यामली जिल्ह्यातीलच कंडेला गावातील रामदन परिसरात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश नावाची एक व्यक्ती या महिलेच्या घरात घुसली आणि त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्यास विरोध केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

टॅग्स