नेपाळमधील पाण्यामुळे 'यूपी'त पूरस्थिती : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

गोरखपूर: उत्तर प्रदेशमधील नद्यांना पूर आला असून, त्याचा फटका हजारो नागरिकांना बसला आहे. नेपाळमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानेच राज्यात ही नैसर्गिक आपत्ती ओढविली आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सांगितले.

पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. पुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यीसाठी नियोजनाची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या स्वतःच्या गावाला भेट दिल्यानंतर ते म्हणाले, ""पुरामुळे ज्यांच्या पक्‍क्‍या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना व पुराच्या पाण्यात झोपड्या वाहून गेलेल्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून घर उपलब्ध करण्यासाठी यादी तयार केली जात आहे.'' मदत छावण्यांमध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरून तक्रारी होत आहे. यावर बोलताना "मदत प्रक्रियेत सुधारणा करण्यात येईल,' अशी ग्वाही आदित्यनाथ यांनी दिली.

पूरग्रस्त भागात मदत साहित्याचे वाटप करण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे. पुरेसे अन्न, पाणी व नावांची सोय करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बेला, जामुवाद, उत्तरसौंध आणि घुंघुनकोटा या पूरग्रस्त गावांना आदित्यानाथ यांनी लष्कराच्या नावेतून भेट दिली. याआधी त्यांनी झूलेलाल मंदिराला भेट देऊन सिंधी समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.