भाजपमधील महिला नेत्यांना राहुल गांधी घाबरतात: हुसेन

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

बलिया : भाजपमधील महिला नेत्यांना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी घाबरत असल्याची टीका भाजप नेते शहनवाझ हुसेन यांनी केली. भाजपमध्ये महिला नेत्या व कार्यकर्त्यांचा सर्वाधिक सन्मान केला जात असल्याचे स्पष्टीकरणही हुसेन यांनी या वेळी केले.

राहुल गांधी यांनी आरएसएस व भाजप समजून घेण्यासाठी आणखी वेळ घ्यावा. आणखी संशोधन करून मग टीका करावी, असा टोलाही हुसेन यांनी या वेळी मारला.

राहुल गांधी यांनी महिला नेत्यांविषयी वापरलेली भाषा दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली. गांधी यांनी टीकेची मर्यादा ओलांडली असल्याचेही हुसेन यांनी सांगितले. राहुल यांच्या टीकेवरून ते भाजपमधील महिला नेत्यांना घाबरत असल्याचेच निदर्शनास येत असल्याचे हुसेन म्हणाले.

टॅग्स