संदीप शर्मा दहशतवादी असेल तर शिक्षा करा; आईची मागणी

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

मुझफ्फरनगर: माझा मुलगा जर दहशतवादी असेल तर त्याला शिक्षा करा, असे संदीप शर्माच्या आईने म्हटले आहे. लष्करे तैयबाचा दहशतवादी असल्याच्या आरोपावरून संदीपकुमार शर्मा ऊर्फ आदिलला जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर काल रात्री उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने संदीपची आई पार्वती आणि अन्य एका नातेवाइकाची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. संदीप शर्माचा तीन दहशतवादी कारवायांत हात असल्याचे सांगितले जाते.

सुटकेनंतर आई पार्वती म्हणाल्या की, जर माझा मुलगा दहशतवादी असेल तर त्याला नक्कीच शिक्षा व्हायला हवी. त्याच्या वर्तनामुळे आम्हाला अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत असून लाजिरवाणे जीवन जगावे लागत आहे. पार्वती आणि रेखा या दोघी घरगुती कामे करून उदरनिर्वाह करतात. पोलिसांच्या मते, संदीप हा 2012 पासून घरातून निघून गेला होता. त्याने जम्मूत नोकरी करत असून आपल्याला दरमहा 12 हजार रुपये मिळत असल्याचे कुटुंबाला सांगितले होते. त्याचा भाऊ हरिद्वार येथे टॅक्‍सीचालक आहे. संदीप शर्मा ऊर्फ आदिलला अटक केल्यानंतर त्याच्या घरी बंदोबस्तासाठी महिला पोलिस अधिकारी नेमले असून त्यांच्या कुटुंबीयावर करडी नजर ठेवली जात आहे. दरम्यान, जम्मू-काश्‍मीर पोलिस महानिरीक्षक मुनीर खान म्हणाले की, 28 वर्षात काश्‍मीरच्या बाहेरील एखादा व्यक्ती काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचे प्रथमच उघड झाले आहे. 16 जून रोजी दक्षिण काश्‍मीरमध्ये एका हल्ल्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संदीपसमवेत आणखी एका दहशतवाद्यावर कारवाई केली आहे. हे दोघेही लष्करे तैयबाच्या आदेशावर काम करत होते.