रोमिओविरोधी पथकाकडून अमानुष उपाय नकोत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांची सूचना

लखनौ- महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली कोणतीही अमानुष कारवाई केली जाऊ नये, अशी सूचना उत्तर प्रदेश सरकारने पोलिसांना शुक्रवारी दिल्या. रोमिओविरोधी पथकाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने ही सूचना दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील महिलांच्या रक्षणासाठी रोमिओविरोधी पथकाची स्थापना केली. विधानसभा निवडणुकीत भाजपने यासंबंधात आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता पक्षाने सत्तेवर आल्यानंतर केली. मुली व महिलांची छेडछाड रोखण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेत पोलिसांकडून मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात नाहीत, अशी तक्रार करून अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी (ता.30) सुनावणी झाली. त्या वेळी न्या. अमरेश्‍वर प्रताप साही आणि संजय हरकौली यांच्या खंडपीठाने रोमिओविरोधी पथकाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच कायद्यानुसार कारवाई करावी, असा आदेश दिला. या पथकाकडून छळवणूक होत आहे, अशा तक्रारी आदित्यनाथ यांच्याकडेही आल्याने त्यांनी यात लक्ष घातले.

महिलांच्या सुरक्षेसाठीच्या उपायांचा सातत्याने आढावा घ्यावा व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या तत्त्वानुसार दोषींचे मुंडन करणे, तोंडाला काळे फासणे किंवा कान धरून उठाबशा काढणे, अशा शिक्षा देता येणार नाहीत, असे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले.

Web Title: uttar pradesh road romeo and court