उत्तर प्रदेशमध्ये 73 लाख रुपये जप्त

पीटीआय
शनिवार, 14 जानेवारी 2017

मथुरा- उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन दहा दिवस झाले आहेत. या काळात 73 लाखांची रोकड, साडेतीन हजार लिटर मद्य व 7.7 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पातळीवरील दक्षता व निरीक्षण समितीचे प्रमुख रवींद्र कुमार यांनी शनिवारी दिली.

बहुजन समाज पक्षाचे नेते सत्यप्रकाश कर्दम यांच्या मालकीच्या गाडीतून आज पाच लाख रुपये, तर वाहन तपासणीच्या काळात चार जणांकडून पाच लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले. निवडणूक मुक्त व निष्पक्ष वातावरणात व्हावे, यासाठी गेल्या दहा दिवसांत तेवीसशे समाजकंटकांना ताब्यात घेतले आहे.

देश

गुवाहाटी - आसाम राज्यामध्ये झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे गेल्या...

01.18 PM

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होताच 2019 मधील पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिला...

09.51 AM

कोडाईकॅनल (तमिळनाडू) : मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

09.42 AM