उत्तराखंडमध्ये काँग्रेस थंड; मोदी लाट कायम 

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

डेहरादून (उत्तराखंड) - सतरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या उत्तराखंड राज्यात आतापर्यंत दोन वेळा भाजपला तर दोन वेळा काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे. यंदा सुरुवातीच्या काही वेळातील निकालाच्या कलानुसार भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येईल, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. 

पहिल्या काही वेळातील कलानुसार भारतीय जनता पक्षाला एकूण 71 जागांपैकी तब्बल 45 जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. तर सध्या 32 जागा असलेल्या काँग्रेसला केवळ 29 जागांवर आघाडी मिळाली आहे. हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागील वर्षी मार्चमध्ये अडचणीत सापडले होते. काँग्रेसच्या नऊ आमदारांनी रावत सरकारविरूद्ध बंडखोरी केली होती. या संकटावर मात करून रावत सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. 

मात्र यावेळी नोटाबंदीच्या निर्णयानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचे चित्र दिसत आहे. नैसर्गिक संसाधनाचा प्रभावी वापर करून नैसर्गिक आव्हानांवर मात करण्याचे मोदी सरकारने दिलेले आश्‍वासन मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

Web Title: Uttarakhand election Narendra Modi Harish Rawat