उत्तराखंड: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 5 हजारांचा दंड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

उत्तराखंड सरकारने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास 5 हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद केली आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंड सरकारने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास पाच हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने शासकीय कार्यालयांमध्ये पान मसाला आणि तंबाखूवर बंदी घातला आहे. त्यानंतर उत्तराखंड सरकारनेही स्वच्छतेसंदर्भातील निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. उत्तराखंडमध्ये मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ककचरा विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार या कायद्याच्या ÷उल्लंघन करणाऱ्याला पाच हजार रुपये किंवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना नगर विकास विभागाने सचिव अरविंद सिंह म्हणाले, "या कायदा पाच महिन्यांपूर्वीच तयार झाला आहे. आतापर्यंत तो शहरी भागातच लागू होता. आता तो ग्रामीण भागातही लागू करण्यात आला आहे. आम्ही त्याला लागू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.'