धक्कादायक! महिलेसह तिच्या सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चालत्या गाडीतच या आई-मुलीवर बलात्कार करण्यात आला.
Crime News
Crime Newsesakal

उत्तराखंडमधल्या हरिद्वारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या रुडकी गावात एक महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीतच बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Uttarakhand woman with her six years old daughter gangraped in Car)

Crime News
जावयानेच केला सासुवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रात्रीच्या वेळी आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह मुस्लीम तीर्थक्षेत्र पिरान कलियार इथून आपल्या घरी परत जात होती. त्याचवेळी या दोघींना सोनू नावाच्या एका व्यक्तीने लिफ्टसाठी विचारलं. या व्यक्तीचे काही मित्र आधीच गाडीत बसले होते. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सोनू आणि त्याच्या मित्रांनी चालत्या गाडीतच महिला आणि तिच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यांना एका ओढ्याजवळ फेकून दिलं.

Crime News
धक्कादायक! युवतीवर वाढदिवसादिवशी तिच्या मित्राकडून बलात्कार

ही महिला मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत किती पुरुष होते याची माहिती ही महिला देऊ शकली नाही. तिला फक्त कार चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव माहित होतं. सोनू नावाची व्यक्ती गाडी चालवत होता. पोलिसांनी सांगितलं की पीडित महिला आणि तिची मुलगी दोघींनाही रुडकी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालात, त्यांच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा तपास सुरू आहे, पण अद्याप त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com