बॉम्बस्फोट प्रकरण : वलीउल्लाह दोषी करार; सोमवारी सुनावणार शिक्षा

Ghaziabad court convicts Waliullah
Ghaziabad court convicts WaliullahGhaziabad court convicts Waliullah

गाझियाबाद : १६ वर्षे जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट (bombing case) प्रकरणातील आरोपी वल्लीउल्लाला गाझियाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. बॉम्बस्फोट मालिकेतील दोन प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायाधीशांनी दहशतवादी वल्लीउल्लाला दोषी ठरवले, तर एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. दोषी ठरलेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालय सोमवारी (ता. ६, जून) शिक्षा (Sentencing) सुनावणार आहे. (Ghaziabad court convicts Waliullah)

आरोपी वल्लीउल्ला याला शनिवारी (ता. ४) दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दुपारी ३.३० वाजता जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी बनारसमधील संकट मोचन मंदिरात झालेल्या स्फोटात वल्लीउल्लाला दोषी ठरवले. येथे बॉम्बचा स्फोट होऊन सात जणांचा मृत्यू झाला होता. दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडल्या (bombing case) प्रकरणीही जिल्हा न्यायाधीशांनी वल्लीउल्लाला दोषी ठरवले.

Ghaziabad court convicts Waliullah
केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; आठ कामगारांचा होरपळून मृत्यू

तिसरी घटना रेल्वे कॅन्ट येथे बॉम्बस्फोटाची होती. येथे नऊ जण मारले गेले. या प्रकरणात वल्लीउल्लाला पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. दोषी ठरलेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालय ६ जून रोजी शिक्षा (Sentencing) सुनावणार आहे. वाराणसी बॉम्ब प्रकरणाची सुनावणी २३ मे रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयात पूर्ण झाली. या शिक्षेवर निकाल देण्यासाठी न्यायालयाने ४ जून ही तारीख निश्चित केली होती.

उत्तर प्रदेश पोलिसांनी ५ एप्रिल २००६ रोजी प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलिउल्लाला अटक केली होती. सबळ पुराव्यांसह पोलिसांनी दावा केला की, संकट मोचन मंदिर आणि कॅन्ट रेल्वे स्टेशन, वाराणसी येथे स्फोट घडवण्याच्या कटामागे वलीउल्लाचा हात होता. पोलिसांनी वलीउल्लाहचे दहशतवादी संघटनेशी संबंधही सांगितले होते.

Ghaziabad court convicts Waliullah
Weather updates : उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता कमीच; आयएमडीचा इशारा

काय आहे प्रकरण?

७ मार्च २००६ रोजी वाराणसीतील (Varanasi) संकटमोचन मंदिर आणि कॅन्ट रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाले होते. याशिवाय दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडला आहे. या बॉम्बस्फोटात (bombing) अनेक जण ठार झाले, तर डझनभर जखमी झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण गाझियाबाद येथे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आले. फिर्यादीच्या वतीने जीआरपी कँट स्फोटात ५३, संकट मोचन स्फोटात ५२ आणि दशाश्वमेध घाट प्रकरणात ४२ साक्षीदार हजर झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com