नरेंद्र मोदींवर केलेले हे गाणे पाहिले का?

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

ईआयसीने हा व्हिडिओ 2 मार्चला अपलोड केला असून, आतापर्यंत हा व्हिडिओ 3,61,222 जणांनी पाहिला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांवर 'ईस्ट इंडिया कॉमेडी (ईआयसी)'ने बनविलेले ग्रुप साँग सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सहा जणांनी गायलेल्या या गाण्यात मोदींच्या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. तर, अमित शहा यांना सर्किट म्हणण्यात आले आहे.

बॉलिवूड गायिका अलिशा चिनॉय हिच्या 'मेड इन इंडिया'या गाण्यावरून ईआयसीने हे ग्रुप साँग केले आहे. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यापासून गाण्याची सुरवात करण्यात आली आहे. 'घुमते है सारी दुनिया, जापान से लेकर रशिया, अँड सम टाइम्स ही स्टॉप्स ओवर इंडिया' असे म्हणण्यात आले आहे. 'इस मुन्नाभाई का सर्किट हे अमित शहा' असा उल्लेख करण्यात आला आहे. 4 जी सेवा देणाऱ्या रिलायन्स बद्दल 'थँक्यू टू हिज फ्रेंड्स इन अँटिला' असे म्हणत हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.

ईआयसीने हा व्हिडिओ 2 मार्चला अपलोड केला असून, आतापर्यंत हा व्हिडिओ 3,61,222 जणांनी पाहिला आहे. 33 सेकंदांच्या या व्हिडिओत नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगताना त्याबद्दल कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे म्हटले आहे.

व्हिडीओ गॅलरी