मल्ल्याकडून फक्त 2 टक्के कर्जवसुली

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

सरकारची राज्यसभेत माहिती; बॅंकांकडून सर्व उपाययोजना सुरू

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी उद्योगपती विजय मल्ल्या याला दिलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या कर्जापैकी केवळ दोन टक्केच कर्ज वसूल झाले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

मल्ल्या याने थकीत कर्ज आणि ते वसुलीच्या उपाययोजनांविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर लेखी उत्तरात गंगवार म्हणाले, की विजय मल्ल्या याच्याकडे 8 हजार 191 कोटी रुपयांचे कर्ज 31 डिसेंबर 2016 पर्यंत थकीत असल्याची माहिती सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी दिली आहे. यातील केवळ 155 कोटी रुपयांचे कर्ज बॅंकांनी मल्ल्या याच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करून वसूल केले आहे. बॅंका कर्ज वसुलीसाठी मल्ल्या याच्या मालमत्तेच्या लिलावासह सर्व उपाययोजना करत आहेत.

मल्ल्या याची कर्जवसुली रिझर्व्ह बॅंकेने मंजूर केलेल्या धोरणानुसार सुरू आहे. मल्ल्या हा सध्या ब्रिटनमध्ये राहत आहेत. भारतात कर्ज बुडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी तो ब्रिटनमध्ये गेला आहे. अनेक यंत्रणांनी त्याच्याविरुद्ध वॉरंट बजावले आहे. अर्थ मंत्रालयाच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयाने त्याचे पारपत्र रद्द केले आहे, असे गंगवार यांनी नमूद केले.