Viral Video : मगरीला Hello करताना दिसलं कासव! व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

सोशल मीडियावर वन्य जीव प्राण्याचे रंजक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत.
Animal Viral Video, Turtle high fives alligator, Viral Animal Video
Animal Viral Video, Turtle high fives alligator, Viral Animal Videoesakal
Summary

सोशल मीडियावर वन्य जीव प्राण्याचे रंजक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. (Viral Animal Video)

आजकाल सोशल मीडियावर (Social Media) वन्य जीव प्राण्याचे रंजक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. जे पाहून सर्वजण आश्चर्यव्यक्त करत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक कासव (Turtle) तलावाच्या आत मगरीसोबत (Crocodile) पोहताना दिसत आहे. ज्यादरम्यान सर्वात खास गोष्ट म्हणजे कासव मगरीच्या अगदी जवळ जाऊन हाय फाइव्ह (Hello) करताना दिसत आहे.

Animal Viral Video, Turtle high fives alligator, Viral Animal Video
Viral Video : मुलीसोबत आईचाही झाला असता अपघात! पण...

सामान्यत: मगरी बऱ्यापैकी प्राणघातक प्राणी मानली जाते आणि पाण्यात त्यांच्या परिसरातील इतर कोणत्याही प्राण्याला जिवंत सोडत नाहीत. पाण्याखाली येणारा कोणताही जीव मगरीला अवघ्या काही मिनिटांत खाऊन टाकतो. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अगदी उलट दिसत आहे. ज्यामध्ये मगर अतिशय शांत दिसत आहे. (Turtle high fives alligator viral video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कासव आणि मगर तलावामध्ये एकत्र दिसत आहेत. यावेळी कासव कोणतीही भीती न बाळगता मगरीभोवती तरंगताना दिसत आहे. अचानक मगरीच्या अगदी जवळ पोहोचून त्याला हाय फाइव्ह देताना दिसतो. जे पाहून युजर्स आश्चर्यचकीत झाले आहेत.

Animal Viral Video, Turtle high fives alligator, Viral Animal Video
Viral Video : कुत्र्याने पहिल्यांदाच स्वतःला पाहिले आरशात अन्...

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर (Instagram) 2.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर 2 लाख 15 हजारहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. युजर्स हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. जे सतत त्यांच्या कमेंटवर रिअॅक्शन देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com