'जगातील सर्वाधिक कमाई' असलेल्या खेळाडुंपैकी विराट एक : फोर्ब्ज

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा फोर्ब्ज मासिकानुसार 'जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं'पैकी एक आहे. या यादीत तो 83व्या क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंपैकी फक्त कोहलीच या यादीत समाविष्ट आहे. 2.4 कोटी अमेरिकन डॉलर कमावणारा विराट हा फोर्ब्जच्या संकेतस्थळानुसार केवळ एकटा भारतीय खेळाडू आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा फोर्ब्ज मासिकानुसार 'जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं'पैकी एक आहे. या यादीत तो 83व्या क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंपैकी फक्त कोहलीच या यादीत समाविष्ट आहे. 2.4 कोटी अमेरिकन डॉलर कमावणारा विराट हा फोर्ब्जच्या संकेतस्थळानुसार केवळ एकटा भारतीय खेळाडू आहे. विशेष बाब म्हणजे 'जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं'च्या 'टॉप 100' यादीत एकाही महिला खेळाडूचे नाव नाही. 

यावेळी फोर्ब्ज संकेतस्थळावर वेगवेगळ्या 11 खेळांमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात 100 पैकी 40 फुटबॉल खेळाडू आहेत. बेसबॉलमधील 14 खेळाडु, सॉसरमधील 9 खेळाडु, गॉल्फमधील 5 खेळाडु, बॉक्सिंग व टेनिसमधील प्रत्येकी 4 खेळाडु, रेसिंगमधील 3 खेळाडु असे 'टॉप 100' खेळाडु समाविष्ट आहेत. 

महिला खेळाडुंपैकी ली ना, मारिया शारापोआ व सेरेना विल्यम्स या 'टॉप 100'च्या यादीत असायच्या, पण ली 2014 मध्ये निवृत्त झाली. तर मारिया शारापोवावर खेळण्याची बंदी असल्याने तीही या यादीत समाविष्ट नाही. सेरेना विल्यम्स ही या वर्षी आई झाल्याने या यादीत समाविष्ट नाही. 

   

Web Title: Virat Kohli Only Indian On This Forbes List