विशालने जैन साधूंची भेट घेऊन मागितली माफी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

चंदीगड - जैन साधू तरुण सागर यांच्याबद्दल असभ्य शेरेबाजी केल्याप्रकरणी चर्चेत आलेले संगीतकार विशाल ददलानी यांनी आज (बुधवार) जैन साधूंची आश्रमात जाऊन भेट घेत माफी मागितली. जैन साधूंनी विशालची माफी स्वीकारली आहे.

या प्रकरणी विशाल ददलानीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ददलानी यांच्यावर अंबाला कॅंटोन्मेंट पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. अखेर आज विशालने चंदीगड येथील आश्रमात जाऊन तरुण सागर यांची माफी मागितली. या भेटीनंतर विशाल म्हणाला की, माझी कोणाची धार्मिक भावना दुखावण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे मी माफी मागितली असून, त्यांनी मला माफ केले आहे. मला वाटतेय की आमच्यात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झाले आहेत.

ददलानी यांनी जैन साधू तरुण सागर यांनी हरियानाच्या विधानसभेत केलेल्या भाषणावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारे ट्विट केले होते. ददलानी यांच्या या ट्विटवरून गोंधळ उडाला होता. त्यानंतर ददलानी सक्रिय असलेल्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी फटकारल्यानंतर ददलानी यांनी तरुण सागर यांची माफी मागितली होती. तसेच, राजकीय संन्यास घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता.