'यूपी'त रायबरेलीसह 53 मतदारसंघात मतदान 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

रायबरेलीसह प्रतापगड, कौशंबी, अलाहाबाद, जलॉंऊ, झाशी, ललितपूर, महोबा, बांदा, हरिमपूर, चित्रकूट व फतेहपूर या जिल्ह्यांसह मागास व टंचाईग्रस्त समजल्या जाणाऱ्या बुंदेलखंड भागातील 1.84 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

लखनौ - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी गुरुवारी (ता. 23) मतदान होत आहे. गांधी घराण्याचा परंपरागत रायबरेली मतदारसंघासह 12 जिल्ह्यांतील 53 मतदारसंघात आज (गुरुवार) मतदान होत आहे. 

रायबरेलीसह प्रतापगड, कौशंबी, अलाहाबाद, जलॉंऊ, झाशी, ललितपूर, महोबा, बांदा, हरिमपूर, चित्रकूट व फतेहपूर या जिल्ह्यांसह मागास व टंचाईग्रस्त समजल्या जाणाऱ्या बुंदेलखंड भागातील 1.84 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 84 लाख महिला असून तृतीयपंथी मतदारांची संख्या एक हजार 32 आहे. एकूण 680 उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून यातील सर्वाधिक 26 उमेदवार उत्तर अलाहाबाद मतदारसंघातून लढत आहेत. खागा, मंझानपूर व कुंदा या मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे सहा मतदार रिंगणात आहेत. 

राज्यातील चौथ्या टप्प्यात रामपूर खासमधून कॉंग्रेसच्या आमदार आराधना मिश्रा, कुंदातून मंत्री रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजाभैय्या, रायबरेलीतून कॉंग्रेस उमेदवार अदिती सिंह, बहुजन समाज पक्षातून बाहेर पडलेले स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुत्र उत्कर्ष मौर्य हे उचाहरमधून भवितव्य अजमावत आहे. 

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

07.48 PM

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी...

07.36 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM