काश्‍मीर पेटेल;सहा महिन्यांपूर्वीच सांगितले होते:राहुल गांधी

वृत्तसंस्था
रविवार, 4 जून 2017

सरकार काश्‍मीरप्रश्‍नी चुकीचे धोरण राबवित असून यामुळे काश्‍मीरमध्ये आग पसरेल, असा इशारा मी दिला होता. परंतु जेटली यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले...

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या अशा धोरणामुळे काश्‍मीरमध्ये आग पसरेल, हे मी सहा महिन्यांपूर्वीच सांगितले होते, असे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (रविवार) स्पष्ट केले.

"सुमारे सहा-सात महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे मला भेटण्यासाठी आले होते. यावेळी सरकार काश्‍मीरप्रश्‍नी चुकीचे धोरण राबवित असून यामुळे काश्‍मीरमध्ये आग पसरेल, असा इशारा मी त्यांना दिला होता. परंतु जेटली यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले,'' असे गांधी म्हणाले.

एनडीए सरकारच्या "अकार्यक्षमते'मुळेच काश्‍मीर प्रश्‍न पेटत असल्याचे मत गांधी यांनी यावेळी व्यक्त केले. काश्‍मीर हे भारताचे सामर्थ्य आहे; मात्र सरकारच्या धोरणामुळे काश्‍मीर ही भारताची कमकुवत बाजु ठरत असल्याचेही गांधी यांनी म्हटले आहे.