फित कापण्यासाठी निवडून आलो नाही: मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

डेहरादून (उत्तराखंड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) येथील एका सभेत बोलताना दीपप्रज्वलन करण्यासाठी किंवा उद्‌घाटनाची फित कापण्यासाठी मी निवडून आलो नाही, तर मी देशाचा पहारेकरी म्हणून काम करत असून देशाला उध्वस्त करणाऱ्या काळ्या पैशाविरुद्ध लढत आहे, असे प्रतिपादन केले.

चार धाम महामार्ग प्रकल्पाच्या उद्‌घाटनानंतर आयोजित परिवर्तन रॅलीत मोदी बोलत होते. ते म्हणाले, "छोटे छोटे समारंभ आणि फित कापण्यासाठी मी देशाचा पंतप्रधान झालो आहे का? मी ज्यावेळी पहारेकरी म्हणून काम करतो त्यावेळी लोक नाराज होतात.' नोटाबंदीच्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले, "आम्ही म्हणालो होतो की भ्रष्ट व्यक्तींना आम्ही शिक्षा करणार आणि आता आम्ही शिक्षा करत आहोत. ही "स्वच्छता मोहिम' असून भारतातील लोक मला मदत करत आहेत. आठ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बनावट नोटा बनविणारे, दहशतवादी, मानवी तस्करी करणारे आणि ड्रग माफिया अस्वस्थ झाले आहेत.' देशभरातील नागरिकांना नोटाबंदीच्या निर्णयामुळे होत असलेल्या त्रासाबाबत चिंता व्यक्त करत मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी लोक पुढाकार घेत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे सांगितले.

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदी बोलत होते. बहुजन समाज पक्षाने नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर बॅंकेत 104 कोटी रुपये जमा केले आहेत. तर, मायावती यांच्या भावाच्या खात्यावर 1 कोटी 34 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील करोलबाग येथील युनियन बॅंकेवर छापा टाकला. त्यामध्ये ही बाब समोर आली.