उरीमधील हल्ल्याचा तीव्र निषेध- नरेंद मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरच्या उरीमधील एका लष्करी तळावर शनिवारी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या घृणास्पद आणि भ्याड हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही, अशा कठोर शब्दांत इशारा दिला. 

हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना पंतप्रधानांनी हुतात्मा झालेल्या जवानांना आम्ही सलाम करतो आणि त्यांची देशसेवा नेहमीच लक्षात राहील, असे नमूद केले. उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मी देशाला आश्‍वासन देतो की, या हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही, असे ट्विट मोदी यांनी केले. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना मी सलाम करतो. त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. संपूर्ण देश हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसमवेत आहे, असे ट्विट त्यांनी केले. गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांशी माझी चर्चा झाली असून, संरक्षणमंत्री स्वत: जम्मू-काश्‍मीरमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करतील, असेही मोदी यांनी नमूद केले.

Web Title: We strongly condemn terrorist attack in Uri, says PM Narendra Modi